गाव तिथे शिवसेना आणि घर तेथे शिवसैनिक ही योजना राबवणार – ॲड. ब्रह्माजी केंद्रे

0
गाव तिथे शिवसेना आणि घर तेथे शिवसैनिक ही योजना राबवणार - ॲड. ब्रह्माजी केंद्रे

उदगीर (एल पी उगिले) लातूर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचे वर्चस्व कायम राहावे या दृष्टीने शिवसैनिक कामाला लागले आहेत. आता प्रत्येक गावागावात शिवसेना आणि घराघरात शिवसैनिक निर्माण करण्याची जबाबदारी या नव्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली आहे आणि त्या दृष्टीने कामकाजही सुरू झाले आहे. याबद्दल आपल्याला आनंद वाटत आहे. असे विचार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ॲड. ब्रह्माजी केंद्रे यांनी व्यक्त केले. ते उदगीर तालुक्यातील
मौजे कासराळ येथे शिवसेना शाखेचे उदघाटन शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.ब्रम्हाजी माधवराव केंद्रे. यांच्या हस्ते झाले, यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, माजी सभापती चाकूर माधव कोळगावे, पं स सदस्य चाकूर प्रा बेडगे ,चाकूर तालुकाप्रमुख खंडू वाघ,अनिल पंचाक्षरी शहरप्रमुख उदगीर,हाके पाटील,भानुदास कबनुरे,सचिन पाटील,पुंडलिक जाधव,सचिन जाधव,मारोती सोळुंखे,गोविंद बिरादार,बालाजी सोळुंखे,सरपंच येल्लावाड,नूतन शिवसेना शाखाप्रमुख व्यंकटेश शेळके, उपशाखाप्रमुख मनीष येल्लावाड,संघटक माधव कांनवदे,बुथप्रमुख हणमंत पाटील, गटप्रमुख नारायण मुसने,मार्गदर्शक भागवत येल्लावाड, सचिव संतोष मंदाडे,गुंडेराव येल्लावाड, सुशांत मंदाडे,सहदेव शेळके,गणेश चोले, अजय शिंदे, बालाजी गुरमे,तुकाराम येल्लावाड,विशाल कांबळे,ऋषिकेश कांबळे,रोशन गायकवाड, कैलास गायकवाड, मंगेश शेळके, तुकाराम टेकले, अजित पाटील,लक्ष्मण कांबळे, प्रल्हाद मुसने,प्रकाश मुसने, गोपाळ पाटील,नितेश शेळके, सुविध्य शेळके, सुरज तेलंग,ओम मंदाडे,ज्ञानेश्वर पाटील,नरसिंग पाटील,आकाश गोडराज कांबळे इत्यादी युवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्या सर्व शिवसैनिकांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना ॲड. ब्रह्माजी केंद्र म्हणाले की, सर्वसामान्य माणसाचा विकास डोळ्यासमोर ठेवून आज पर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काम केले आहे त्या कामाची पावती म्हणूनच शिवसेनेकडे युवकांचा ओढा वाढला आहे. हा ओढा असाच वाढत राहील, आणि आगामी निवडणुकीच्या काळात शिवसेना आपली शक्ती दाखवून देईल असा विश्वासही आपल्याला वाटत आहे असेही एडवोकेट ब्रह्माजी केंद्रे यांनी स्पष्ट केले. शाखा उद्घाटन प्रसंगी उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!