गुरुपौर्णिमा निमित्त सोमनाथपूर येथे वृक्षारोपण संपन्न
सोमनाथपूर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील सोमनाथपूर येथे गुरुपौर्णिमा साजरी केली गेली, यात वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे निसर्ग हाच सजीव सृष्टीचा प्रथम आणि अंतिम गुरु विचारात घेवून, गावच्या सरपंच अंबिका पवार, उपसरपंच अमित माडे, ग्राम विकास अधिकारी अवकाश पवार सह सर्व ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य,सदस्यांनी एकत्रितपणे उदगीरचे तहसीलदार राम बोरगांवकर, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, विस्तार अधिकारी दंडे , अंकुश बिरादार, भांगे यांच्या उपस्थितीत 100 नवीन झाडे लावून गुरुपौर्णिमा साजरी केली.
या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी सरपंच अंबिका पवार, उपसरपंच अमित माडे, ग्राम विकास अधिकारी अवकाश पवार, सदस्या शिवकर्णा अंधारे, लिपिक सुषमा वाघमारे, संगणक परिचालक धनाजी कांबळे, ग्राम रोजगार सहाय्यक अविनाश वाघमारे सह सदस्या,सदस्य सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
