वर्षाला एक वासरू या धोरणाचा अवलंब करावा – डॉ. नंदकुमार गायकवाड

0
वर्षाला एक वासरू या धोरणाचा अवलंब करावा - डॉ. नंदकुमार गायकवाड

उदगीर (एल पी उगीले) येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात
नांदेड जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार यांचे करिता केंद्र शासनाच्या योजनेच्या अंतर्गत बहुउद्देशीय कृत्रिम रेतन तंत्रज्ञ निर्मिती एक महिन्याचे निवासी तांत्रिक प्रशिक्षण सहयोगी अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले. सदर प्रशिक्षणामध्ये नांदेड जिल्ह्यातील 30 सुशिक्षित बेरोजगार युवक यांना पशुधनामध्ये कृत्रिम रेतनाचे तांत्रिक मार्गदर्शन व निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड यांनी भूषविले त्यांनी मैत्री प्रशिक्षणातून घेतलेल्या ज्ञानाचा वापर पशुपालकांच्या गोठ्यातील जनावरांचे दूध उत्पादन वाढणे तसेच वर्षाला एक वासरू या धोरणाचा अवलंब करण्याकरिता करावा. असे आवाहन केले. प्रमुख पाहुणे डॉ. राजकुमार पडिले उपसंचालक पशुसंवर्धन विभाग नांदेड यांनी नांदेड जिल्ह्यातील पशुधनाची व कृत्रिम रेतनाची सध्यास्थिती यावर प्रकाश टाकला. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम बाकलीकर यांनी कृत्रिम रेतनाचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. अनिल पाटील यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. राहुल सूर्यवंशी यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदव्युत्तर विद्यार्थिनी डॉ. वंशीका हिने केले. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता डॉ. विवेक खंडाईत सह समन्वयक व पदव्युत्तर विद्यार्थिनी डॉ. नंदिनी यांनी परिश्रम घेतले. तसेच डॉ. संजीव पिटलावार व डॉ. प्रफुल पाटील यांची उपस्थिती लाभली .

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!