उदगीर इनरव्हीलचा पदग्रहण सोहळा मा.अनुराधाजी चांडक यांच्या उपस्थितीत संपन्न
उदगीर (एल पी उगीले) येथील इनरव्हील क्लबचा २०२५-२६ या वर्षाचा पदग्रहण सोहळा अनुराधाजी चांडक यांच्या उपस्थितीत शिवनंदा फंक्शन हाॅल येथे संपन्न झाला.नुतन अध्यक्ष पल्लवी मुक्कावार, उपाध्यक्ष अलका येरोळकर,सचिव योजना चौधरी, सहसचिव प्रिया नारखेडे, कोषाध्यक्ष स्वाती गुरुडे,आय. एस.ओ रोहिणी चाटे, एडिटर अश्विनी देशमुख व क्लब सीसी मीरा चंबुले यांनी पदभार स्वीकारला.या कार्यक्रमात माजी अध्यक्ष मानसी चन्नावार यांच्या कार्यकाळात उत्तम प्रोजेक्ट करून क्लबला सहकार्य करणाऱ्या सर्व प्रायोजकांचा याच बरोबर इक्को ब्रिक्स बनवणे व जास्तीत जास्त मिटींग उपस्थिती अशा सर्व सदस्याचा विशेष पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अतिथी अनुराधाजी यांनी आपल्या भाषणात महिलांनी कशा प्रकारे स्वतःच्या वेळेचे नियोजन करून घर, नोकरी सांभाळून इनरव्हील क्लबसारख्या संस्थेशी जोडून समाज कार्यातून स्वतःची प्रगती करावी, याबद्दल मार्गदर्शन केले.
या वर्षीचे तीन महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट या कार्यक्रमात करण्यात आले.१ जुलै कृषी दिनाच्या निमित्ताने कष्टकरी गरजू महिला शेतकऱ्यांना फवारणी यंत्र व ताटपत्री याचे वाटप करण्यात आले. याचबरोबर आजची युवती सक्षम व सदृढ रहावी यासाठी सुवर्णामाता विद्यालयातील बारा मुलींना योगा ड्रेसचे वाटप प्रोजेक्ट प्रमुख सौ. दिपा आंबेसंगे यांनी केले.याच बरोबर इनरव्हील ब्रेंडींगचा बोर्डचे प्रमुख अतिथीच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी उदगीर इनरव्हीलचे सर्व इसी व सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले.
