सैनिकी विद्यालयाचे इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत 14 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

0
सैनिकी विद्यालयाचे इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत 14 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

उदगीर (प्रतिनिधी)
श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयाचे 14 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले आहेत. विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या यशाची परंपरा कायम ठेवत उज्वल यश संपादन केले आहे.
शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षातील इ‌ 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत एकुण 53 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 46 विद्यार्थी पात्र झाले तर 14 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले आहेत.
विद्यालयातील विद्यार्थी सुमित देशमुख 232,सार्थक मोरे 224 , सोहम पौळ 222, पवार शंतनू 220, पृथ्वीराज बोधगिरे 216, कार्तिक देशटवाड 214, ऋत्विक एन्लावर 214 , शिवराज चेंडके 214 , गुंजीटे सार्थक 212, पवन अनंतवाड 210 , गणेश गुंडरे 210 , प्रशांत रोंटेवाड 208, सार्थक ऐन्लावार 208, सुमित मुपडे 208 याप्रमाणे हे 14 विद्यार्थी इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत गुण प्राप्त करुन शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरुन शिष्यवृत्तीधारक बनले आहेत.
इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा विभाग प्रमुख म्हणून उज्वला वडले यांनी तर इ. 6 वी ते 8 वी वर्गाचे विभाग प्रमुख म्हणून संतोष चामले यांनी काम पाहिले आहे.
इ. 8 वी शिष्यवृत्तीचे अतिरिक्त तास, प्रत्येक घटकावर वस्तुनिष्ठ व दीर्घोत्तरी प्रश्नपत्रिका , संपूर्ण अभ्यासक्रमावर वीस सराव परीक्षा व योग्य नियोजना मुळे एकुण चौदा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झालेली आहे.
या सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचे व यांना मार्गदर्शन करणारे सहशिक्षक उज्वला वडले व संतोष चामले, बालाजी मुस्कावाड व बालाजी कांबळे, विनायक करेवाड व विजय कावळे यांचेही अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष बसवराज म. पाटील, उपाध्यक्ष चंदन पाटील ,शालेय समितीचे अध्यक्ष दिलीप पाटील ,सहसचिव चेतन पाटील ,प्राचार्य वसंत कुलकर्णी ,पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के ,विभाग प्रमुख संतोष चामले, विलास शिंदे, प्रा. प्रदीप कोठारे ,सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!