महिला मंडळाच्या वतीने गुरुच्या प्रतिमेची पूजा

0
महिला मंडळाच्या वतीने गुरुच्या प्रतिमेची पूजा

उदगीर (एल पी उगीले)
रूद्र महिला मंडळ व दाक्षयणी महिला मंडळाच्या वतीने गुरूच्या प्रतिमेची पुजा व प्रार्थणा करून मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. मोठ्या उत्साहाने गुरू पौर्णिमा साजरी करण्यात आली. रूद्र महिला मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती विजयाताई चंवडा व दाक्षयणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. उमा शेटकार प्रमुख पाहुणे म्हणून सौ. कलावती भाताब्रें व सीता शेटकार हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुजाता शिवपुजे यांनी केले. तसेच भाताब्रे ताई यांनी गुरू पौर्णिमा का साजरी करतात? व आपल्या जीवनात गुरू आसतो ध्यास कीर्तीचा, गुरू आसतो श्वास पूर्तीचा, गुरू आसतो मार्ग यशाचा गुरू आसतो किरणं आशेचा, अशा शब्दात गुरू विषयी माहिती सांगीतली. सौ. सिता शेटाकार यांनी गुरू म्हणजे ज्ञनाचे सागर , गुरू म्हणजे अखंड वाहणारा झरा आहे, आपल्या आयुष्यात प्रत्येक वळणावर गुरूची आवश्यकता असते असे सांगितले. गुरू म्हणजे काय यांच्यावर सौ. शिवानी चंवडा यांनी छान मनोगत व्यक्त केले.सौ. धनाश्री कल्याणे यांनी गुरु कसा आणि गुरूचे महत्व यावर विचार मांडले.प्रत्येकानी गुरू बद्द्ल मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला दाक्षयणी महिला मंडळाच्या सदस्यां आरुणा कल्याणे , सुजाता गिराम , जया शिवपुजे , मंदा शिवपुजे ,सरोज शिवपुजे ,स्वप्ना भालके, पुष्पा मजगे , संगीता मेनकुदळे , सिंधू निटुरे यांच्यासह सदस्या उपस्थित होत्या . तसेच दाक्षयणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. उमा शेटाकार यांनी आपले मनोगत व्यक्त करुन प्रमुख पाहुणे यांचे आभार मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!