दिंडीतील वृक्षाचे शेतकर्यांच्या शेतात रोपणत्या वृक्षांचा होणार वाढदिवस
उदगीर (एल.पी.उगीले) येथील मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित मातृभूमी महाविद्यालय कस्तुराबाई नर्सिंग स्कूल व मातृभूमी नर्सिंग स्कूल च्या वतीने आषाढीवारी निमित्त शहरातून पर्यावरण व संस्कृती संवर्धनासाठी दिंडीचे आयोजन केले होते. त्या दिंडीत विद्यार्थ्यांनी हातात वृक्षाचे रोपटे घेत दिंडीत सहभागी झाले होते. ते वृक्ष पिंपरी येथील संग्राम बिरादार यांच्या शेतात वृक्षाची लागवड करण्यात आली. मातृभूमी संस्थेच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी शहरातून वृक्षदिंडी काढली होती. यादिंडीचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी शफिक शेख, मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश उस्तुरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. वृक्ष दिंडीतून पर्यावरण व संस्कृती संवर्धनाचा संदेश दिला होता. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धना बरोबर सामाजिक जाणीव निर्माण व्हाव्यात, यासाठी वृक्षदिंडी सोबतच वृक्षदिंडीतील वृक्ष शेतकऱ्यांच्या शेतात रोपण करून विद्यार्थ्यांमध्ये संवेदना निर्माण करत असल्याचे काम मातृभूमी महाविद्यालयाच्या माध्यमातून होत असल्याची माहिती प्राचार्य उषा कुलकर्णी यांनी दिले
त्या वृक्षांचा वाढदिवस साजरा होणार
मातृभूमी महाविद्यालयाच्या वतीने वृक्ष दिंडीतील वृक्षारोपण केलेल्या वृक्षांच्या संगोपनाबरोबरच वाढदिवस ही पुढील आषाढीवारीच्या दिवशी साजरा होणार असल्याची माहिती मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश उस्तुरे यांनी दिली आहे.
