वरिष्ठ पोलीस निरीक्षक गाडे व सामाजिक कार्यकर्ते उपाध्ये यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा….
उदगीर (प्रतिनिधी) उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजू झालेले उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक कर्तव्यदक्ष अधिकारी दिलीप गाडे व तसेच सामाजिक कार्यकर्ते आनंद उपाध्ये यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे यांनी पोलीस निरीक्षक दिलीप गाडे व आनंद उपाध्ये यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करून शुभेच्छा दिल्या. युवकांनी रस्त्यांवर केक कापून डीजे लावून नाचण्यापेक्षा असे सामाजिक उपक्रम राबवावेत, असे यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी भातलवंडे म्हणाले. पोलीस निरीक्षक गाडे व सामाजिक कार्यकर्ते आनंद उपाध्ये यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, अन्नदान, फळे वाटप असे विविध सामाजिक उपक्रम साजरे करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गाडे, उदगीर शहर पोलीस स्टेशनचे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक बिरप्पा भुसनुर, पोलीस कर्मचारी योगेश फुले, मानवाधिकार संरक्षण समितीचे नितीन एकुर्केकर, लष्करे भीमा संघटनेचे सुशील मादळे, कृष्णा मोगले, संजय होनराव,राहुल कांबळे. आदित्य गायकवाड. कार्तिक कांबळे. कृष्णा श्रीमंगले ,सत्यम ढोबळे. यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. हा स्तुत्य उपक्रम असून युवकांनी व्यसनापासून दूर राहावे. समाजाची सेवा करावी. असे मत यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे यांनी व्यक्त केले.
