एलसीबीच्या पथकाने तीन लाख 12 हजाराचा पकडला गुटखा !!
अवैध धंदेवाल्यांना दिला चांगला झटका !!
लातूर (एल पी उगीले) लातूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धाडसी कामगिरी करत तीन लाख 12 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या आदेशानुसार अवैध धंद्याच्या विरोधात कठोर मोहीम राबवण्याच्या उद्देशाने खाजगी वाहनाने पोहे का युवराज गिरी स्वामी मदने जमीर शेख कांबळे हे गस्त घालत असताना, त्यांनी नेमलेल्या गुप्त बातमीदारांनी या पथकाला महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा विक्रीच्या संदर्भात माहिती दिली. सदरील माहितीची शहानिशा केल्यानंतर दोन पंचांना बोलावून, त्या बातमीच्या संदर्भात स्पष्टीकरण केले. आणि पंच होण्यास तयारी असल्याचे दर्शविल्यानंतर त्यांना सोबत घेऊन नाथ नगर मळवटी रोड लातूर येथे भंडारी यांच्या घरी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास पोहोचले असता, त्या ठिकाणावरून अंधाराचा फायदा घेऊन पोलीस आल्याचा सुगावा लागल्याने एक इसम पळून जात असल्याचे निदर्शनास आले. त्या घरी गेल्यानंतर पोर्चमध्येच महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्रीसाठी आणून ठेवला असल्याचे आढळून आले. बातमीदारांनी सांगितले होते की, आत्ताच माल उतरलेला आहे. बातमीदारांनी दिलेल्या बातमी प्रमाणे पोर्चमध्ये प्रतिबंधित गुटखा आढळून आला. त्या गुटख्याच्या संदर्भात माहिती जाणून घेण्याच्या उद्देशाने सदरील घराचे मालक कोण? याची माहिती घेतल्यानंतर त्या घराचे मालक ज्योती तुकाराम भंडारी (वय 40 वर्ष राहणार नाथ नगर मळवटी रोड लातूर) हे असल्याचे समजले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदरचे घरी भाडेकरू म्हणून ज्ञानोबा व्यंकट भंडारी हे त्यांच्या परिवारासोबत राहतात असे समजले. सदर बाबत ज्ञानोबा व्यंकट भंडारी यांना पंचा समक्ष पोलिसांनी पंचनामा करण्यासाठी आलेले पंच आणि स्वतःची ओळख देऊन अंग झेडपी घेऊन सदरचा गुटखा कोणाचा आहे? व तो पळून गेलेला इसम कोण आहे? अशी विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, सदरचा गुटखा हा माझे नातेवाईक ईश्वर रमाकांत गुंडरे ( रा. शाहू चौक लातूर) यांच्या मालकीचा असल्याचे सांगितले. त्यावरून पोलीस पथकाने अंगणात ठेवलेल्या पांढऱ्या रंगाच्या पोत्याची झडती घेतली असता, त्या पोत्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला जुगनू प्रीमियम क्वालिटी जर्दा 500 ग्रॅम वजनाचे पाकीट 240 पाकीट एकूण किंमत एक लाख वीस हजार रुपये तसेच गुलाबी रंगाच्या सुगंधी जर्दा 480 पाकीट त्याची अंदाजे किंमत एक लाख 92 हजार हे पोलिसांनी पंचा समक्ष जप्त केले. याप्रकरणी ईश्वर रमाकांत गुंडरे राहणार शाहू चौक लातूर यांनी स्वतःच्या फायद्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ एकूण किंमत तीन लाख 12 हजार रुपये चा माल बाळगल्या प्रकरणी कलम 123,274,275,223 भारतीय न्याय संहिता अन्वये पोहे का युवराज गिरी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
