हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणात उच्च न्यायालयाकडून आरोपीस जामीन

0
हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणात उच्च न्यायालयाकडून आरोपीस जामीन

उदगीर (प्रतिनिधी) उच्च न्यायालयाचे न्या. अरुण पेडणेकर यांनी आरोपी राजू उर्फ राजकुमार सोनटक्के यास नियमित जामीन दिला आहे. सदर प्रकरणी फिर्यादी मनोहर संग्राम सोनटक्के याने त्याचे लोहारा शिवारात शेत आहे. सदर शेतीस जाण्या साठी बाबू सोनटक्के यांच्या शेतातून रास्ता आहे. सदर रस्ता वापरण्यावरून झालेल्या वादात आरोपी राजू आणि इतर आरोपींनी फिर्यादी आणि त्याच्या कुटुंबीयांवर काठी, कुऱ्हाडीने हल्ला केल्याचा आरोप करणारी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, आरोपी राजू उर्फ राजकुमार ने त्याच्यावर व त्याच्या कुटुंबीयांवर हल्ला करत डोक्यावर कुऱ्हाडीने मारहाण केली, अशी तक्रार उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात सत्र न्यायालय, उदगीर येथे आरोपीकडून नियमित जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, सत्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावला.
सदर नाराजीने आरोपीने उच्च न्यायालयात अ‍ॅड. अजिंक्य रेड्डी यांच्या मार्फत जामिनासाठी याचिका दाखल केली. यावेळी उच्च न्यायालयात युक्तिवाद करताना, मूळ फिर्यादीच्या डोक्यावर केवळ किरकोळ स्वरूपाची जखम झाली असून, आरोपीने कुऱ्हाडीने मारहाण केल्याचा वैद्यकीय पुरावा सद्यस्थितीत उपलब्ध नाही. म्हणून आरोपीने सदर गुन्हा खून करण्याच्या उद्देशाने केला असा निष्कर्ष काढता येणार नाही.
या युक्तिवादाचा विचार करून न्यायमूर्ति अरुण पेंडनेकर यांनी आरोपीस जामीन मंजूर केला. या प्रकरणात अ‍ॅड. अजिंक्य रेड्डी यांनी युक्तिवाद सादर केला, तर अ‍ॅड. विष्णु कंदे यांनी सहकार्य केले.प्रकरणातील आरोपी राजकुमार सोनटक्के याला अखेर उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!