तिसर्‍या लाटेची भिती लक्षात घेता लसीकरण आवश्यक – वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रमोद सांगवीकर

तिसर्‍या लाटेची भिती लक्षात घेता लसीकरण आवश्यक - वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रमोद सांगवीकर

अहमदपूर (गोविंद काळे) : कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची भिती लक्षात घेता लसीकरण करून घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन किनगाव येथील वैद्यकिय अधिकारी प्रमोद सांगवीकर यांनी केले. याबाबत अधिक माहिती अशी की, येथुन जवळच असलेल्या किनगाव येथे लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 10249 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. दि. 23 जुलै रोजी 110 लसीकरण झाले होते. यावेळी आमच्या प्रतिनिधिशी बोलताना वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रमोद सांगवीकर म्हणाले की, किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळत आहे. वेळोवेळी आम्ही लसीकणासंबंधी समुपदेशन करत असतो. लसीकणाचे महत्व नागरीकांना सांगत असतो. या प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमितपणे कोरोनाची तपासणी होते त्यामध्ये आरटीपीसीआर, रॅपीड तपासणी नियमित दररोज केली जाते. दि. 23 जुलै रोजी 110 लसीकरण झाले असुन 5 मार्च पासुन लसीकरण मोहिमेची सुरुवात झाली आहे. आजतागायतपर्यंत एकुण 10249 लसीकरण झालेले आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची भिती लक्षात घेता भारतामध्ये लसीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. लसीकरणामुळेच आपण कोरोनावर मात करु शकतो. असेही ते शेवटी म्हणाले. या लसीकरण कार्यासाठी किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक सौ. सुमित्रा मुळे, आरोग्य सेविका आशा ढाकणे, श्रीमती सुरेखा मिटकरे, आरोग्य सहाय्यक नरहरे, फड, तिर्थंकर, घुले बालाजी, जेएनम श्रीमती भालेराव रेखा, शितल बनसोडे, पीएससी चा सर्व स्टॉफ, मदत करीत आहे. यावेळी युवराज पाटील, सौ. भाग्यश्री पाटील, कु. भाग्यश्री कारामुंगीकर, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.

About The Author