आशा स्वयंसेविका यांची मासिक सभा संपन्न
अहमदपूर ( गोविंद काळे) : येथुन जवळच असलेल्या किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा स्वंयसेविकांची मासिक सभा संपन्न झाली. याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक 26/07/21 रोजी किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आशा स्वयंसेविका यांची मासिक सभा वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रमोद सांगवीकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी प्रामुख्याने गरोदर मातांची प्रसुतीपुर्व, मातेचे वजन, उंची, रक्तदाब, पोटावरून तपासणी इ. आवश्यक तपासणी करणे आवश्यक आहे, कमीत कमी 4 तपासण्या केल्या पाहिजेत, जोखीमेच्या मातांना वेळेत संदर्भ सेवा द्यावी तसेच ज्या मातांचे हिमोग्लोबिन 8.9 ग्रॅमपेक्षा कमी आहे त्याना प्राथमिक आरोग्य केंद्र किंनगाव येथे ळीेप र्ीलीश साठी पाठविण्यात यावेत. माता मृत्यू चे कारणे व दर कमी करणे यासाठी गरोदर माता यांची नियमित तपासणी व शासकीय संस्थेत प्रसूती केल्यास याचे प्रमाण कमी होवू शकते याबाबतीत माहिती दिली तसेच नवीन जन्माला आलेल्या बाळाच्या मुत्यु दर कमी करण्यासाठी हलपल ( होम बेस्ड नियोनेटल केअर) चांगल्या प्रकारे केली पाहिजे, प्रसूति पश्चात तांबी, इंजेक्शन अंतरा याबद्दल माहिती देवुन सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवत करावे, तसेच या सभेमध्ये इतर आरोग्य सेवा कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. या मासिक सभेला किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रमोद सांगवीकर, आरोग्य सहाय्यक सौ. सुमित्रा मुळे, आरोग्य सेविका आशा ढाकणे, श्रीमती सुरेखा मिटकरे पीएससी चा स्टॉफ , आशा कार्यकर्ती मोठ्या संख्येनी उपस्थित होते.