जमियात उलमा ई हिंद यांच्या वतीने कोकण पूरग्रस्तांसाठी मदत
अहमदपूर (गोविंद काळे) : जमियात उलमा ई हिंद यांच्या सौजन्याने कोकण पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शुक्रवारच्या नमाज पठणानंतर अहमदपूर शहरातील मस्जिदइ मध्ये मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते यामध्ये 62 हजार 267 रुपये नगद जमा करण्यात आले. यामध्ये मोठ्या संख्येमध्ये उलेमा (धर्मगुरू) व तसेच सामाजिक कार्यकर्ते व मुस्लिम समाज याचा सहभाग होता. यामध्ये हजरत मौलाना मुक्ती फाजील सहाब कास्मी अध्यक्ष जमियात उलमा ई हिंद अहमदपूर. हाफीज खुर्शीद साहब. मौलाना सय्यद युसुफ साहब (नाझीम मदरसा उस्मान बिन अफआण) हजरत मौलाना शाही इमाम, हाफिज गालिब साहब ,हाफीज इर्शाद साहब, मौलाना इजाज सहाब, हाफिस गौस साहब , हाफिज तोहिद साहब, हाफिज जाकीर साहब हाफिज जकिर साहब, हाफिज असलम साहब हाफिस अब्दुल रहू साहब इस्माईल साहब हाफीज अमर साहब, तसेच माजी उपनगराध्यक्ष कलीमउद्दीन अहमद (जनरल सेक्रेटरी जमियात उलमा ई हिंद लातूर) व तसेच आय्याज भाई (मुस्लीम विकास आघाडी) अन्वर भाई, फारुख भाई एडवोकेट जुनेद साहेब.अफ़रोज़ पठाण, शेख मासुम फारुख भाई या सर्वांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली तसेच पूरग्रस्तांसाठी सर्वांनी मदतीसाठी पुढे यावे असे आव्हान करण्यात आले..!!