आ. बाबासाहेब पाटील यांनी चाकूर येथे जनतेच्या समस्या जाणून घेत सोडविल्या!
चाकूर (गोविंद काळे) : तहसील कार्यालय येथे आमदार बाबासाहेब पाटील यांनी जनतेशी संवाद साधला. त्यांच्या समस्या, प्रलंबित कामे जाणून घेत. तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यामध्ये प्रामुख्याने संजय गांधी निराधार योजनेतील फाइल्स निकाली काढणे. जानवळ येथील कबालनाम प्रमाणे दिलेल्या जागेचा प्रश्न मार्गी लावणे यांचा समावेश होता. तसेच तालुक्यातील रोहित्र दुरुस्ती व सिंगल फेस विजे बाबत महावितरण अधिकाऱ्यांना सूचना आमदार यांनी केल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, तहसीलदार शिवानंद बिडवे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, माजी सभापती करीमसाहेब गुळवे, माजी नगराध्यक्ष मिलिंदराव महालिंगे, राष्ट्रवादी काँगेस शहराध्यक्ष गणेश फुलारी, पं.स. सदस्य हरिभाऊ काळे, अनिलराव वाडकर, इलियास सय्यद, दयानंद सुरवसे, चेअरमन यशवंतराव जाधव, उपअभियंता महावितरण अभिजित आडगुबे, युवक शहराध्यक्ष बिलाल पठाण, विष्णू तिकटे, संदीप शेटे, किसानसभा तालुकाध्यक्ष रामदास घुमे, सरपंच गांजूर लालासाहेब शिंदे, सिद्धेश्वर लोहारे, जि प.बांधकाम अभियंता यादव कर्डीले, सचिन तोरे, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.