देवनी पंचायत समितीचा गौरव

देवनी पंचायत समितीचा गौरव

देवणी (प्रतिनिधी) : पंचायत समितीच्या “सुंदर माझे कार्यालय” अंतर्गत झालेल्या कामाची दखल घेऊन पंचायत समिती देवणीला ISO नामांकन प्राप्त झाले आहे.त्या बद्दल सत्कार करण्यात आला. सदर नामांकनाचे अनावरण करण्यात आले. हे नामांकन मिळविण्यामध्ये सभापती श्रीमती सविताताई पाटील, उपसभापती श्री.शंकरजी पाटील तळगवकर, गटविकास अधिकारी श्री.मनोजजी राऊत, सर्व सदस्य तसेच कार्यालयाचे सर्व कर्मचारी यांचे योगदान आहे. सदर नामांकन मिळणे हा एकप्रकारे गौरवाचा क्षण आहे. असे आ.निलंगेकर म्हणाले.

यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री.रामभाऊजी तिरुके, जि.प. सदस्य श्री.पृथ्वीराजजी शिवशिवे, जि.प.सदस्य श्री.प्रशांतजी पाटील, श्री.दगडुजी सोळुंखे, श्री.भगवानजी पाटील तळेगावकर, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष श्री.काशिनाथजी गारिबे, श्री.हावगीरावजी पाटील, श्री.तुकारामजी पाटील, उपसभापती तथा भाजपायुमो तालुकाध्यक्ष श्री.रामलिंगजी शेरे, कृषी सभापती श्री.बालाजी बिरादार जी, श्री.प्रशांतजी पाटील, श्री.सुधीरजी भोसले, सरपंच श्री.सदाशिवजी पाटील, तहसीलदार श्री.सुरेशजी घोळवे, ग्रामसेवक श्री.गोरे, शहराध्यक्ष श्री.अट्टलजी धनूरे, माजी सभापती श्री.सत्यवानजी कांबळे, श्री.सोमनाथजी बोरोळे, श्री.राजजी गुणाले, सरपंच श्री.हनुमंतजी बिरादार, श्री.श्रीकांतजी पताळे, श्री.धनाजी जाधव जी आदींची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!