मुंशी प्रेमचंद यांचे साहित्य जीवन दर्शन घडविणारे – प्रा. प्रवीण जाहूरे
उदगीर (प्रतिनिधी) : हिंदी साहित्याला समृद्ध करणारे लिखाण प्रेमचंद यांनी केले आहे. गोदान, गबन, निर्मला, बडे घर की बेटी, कफन यासारख्या अनेक साहित्य निर्मितीतून मनोरंजनाबरोबरच मानवी जीवन दर्शन घडविले आहे, असे मत प्रा. प्रवीण जाहूरे यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील हिंदी विभागाच्यावतीने मुन्शी प्रेमचंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. पुढे बोलताना प्रा. जाहूरे म्हणाले, भाषा माणसं जोडण्याचे कार्य करते आणि प्रेमचंद यांचे साहित्य ही भूमिका तंतोतंतपणे पार पाडताना दिसते. कोणत्याही देशाचे मूल्यमापन त्या देशातील साहित्यिकांनी केलेल्या साहित्य निर्मितीवर केले जात असते. आपल्या देशाच्या हिंदी साहित्य निर्मितीमध्ये मुंशी प्रेमचंद यांचे योगदान अतुलनीय आहे. हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. बळीराम भुक्तरे म्हणाले, प्रेमचंद यांचे साहित्य वास्तव दर्शन घडविणारे, देशभक्ती व राष्ट्रभावना जागृत करणारे आहे. ग्रामीण व नागरी जीवनाचे प्रासंगिक दर्शन मुन्शी प्रेमचंद यांच्या साहित्यातून होते. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, प्रा. डॉ. गौरव जेवळीकर, कार्यालय अधीक्षक श्रीमती प्रतिभा गायकवाड, क्रीडा संचालक प्रा. सतीश मुंढे, प्रा. डॉ. व्ही. एस. चन्नाळे, प्रा. डॉ. के. एस. भदाडे, कार्यालयीन कर्मचारी कार्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.