प्राचार्य, उस्ताद सय्यद सलीमोद्दीन यांचा निरोप समारंभ कार्यक्रम

प्राचार्य, उस्ताद सय्यद सलीमोद्दीन यांचा निरोप समारंभ कार्यक्रम

उदगीर (प्रतिनिधी) : शहरातील सुप्रसिद्ध शाळा अल-अमीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, उदगीर येथील प्राचार्य, उस्ताद सय्यद सलीमोद्दीन सर यांचा आज 31/7/21 रोजी सेवानिवृत्तीचा दिवस शाळेच्या कर्मचाऱ्यांच्या वतिने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी प्राचार्य, हाशमी सय्यद मुसा सर हे उपस्थित होते. शाळेतील अनेक कर्मचाऱ्यांनी प्राचार्यांसोबतच्या आपल्या जुन्या-नव्या, आत्मीयता व आपुलकीच्या, शैक्षणिक आठवणींना उजाळा दिला. सरांसोबतचे आपले अनुभव व्यक्त करताना अनेक कर्मचाऱ्यांना आपल्या भावना अनावर झाल्या. शाळेच्या प्रगतीत उस्ताद सलीम सरांचा सिंहाचा वाटा असल्याचे कर्मचाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. प्राचार्य उस्ताद सय्यद सलीमोद्दीन सरांनीही आपले अनुभव व्यक्त करताना म्हंटले की माझ्या या सेवेच्या यशस्वीतेमध्ये सर्व कर्मचाऱ्यांसह अल-अमीन संस्थेचाही खूप मोठा वाटा आहे. शेवटी प्रमुख पाहुणे हाशमी सय्यद मुसा सर, पर्यवेक्षक शेख़ मुन्तजीबोद्दीन व इतर कर्मचाऱ्यांच्या हस्ते शाल, पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात सरांच्या परिवारातील सदस्य, मित्रमंडळीही आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद शाकेर सर व आभार प्रदर्शन मुहम्मद अन्वर हुसेन यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!