बापूसाहेब पाटील एकंबेकर हे बहुजनाचे कैवारी होते-डॉ.नरसिंग कदम
उदगीर (प्रतिनिधी) गर्भश्रीमंत कुटुंबामध्ये जन्माला येऊनही बापूसाहेब पाटील यांनी कुठलाही गर्व अंगी न बाळगता समाजसेवेसाठी स्वतःला वाहून घेतले.अनेक चळवळी उभ्या केल्या. त्यांनी सामाजिक कार्य निस्वार्थी भावनेने केले. ते बहुजनाचे कैवारी होते. असे उद्गार शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,हंडरगुळी येथे आयोजित केलेल्या बापूसाहेब पाटील एकंबेकर यांच्या पुण्यतिथी निमित्त मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ महाराष्ट्र राज्याचे सदस्य साहित्यिक डॉ.नरसिंग कदम यांनी काढले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक सय्यद रफिक हे होते. तर व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती पर्यवेक्षक (स्काऊट मास्टर) सुगावे बालाजी, विज्ञान विभागाचे प्रमुख व्यंकट कणसे यांची होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बापूसाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. साहित्यिक कदम यांनी शाळेसाठी त्यांनी लिहिलेली पुस्तकं भेट दिली.
पुढे बोलताना डॉ.कदम म्हणाले, बापूसाहेब पाटील यांनी अंबाजोगाई या ठिकाणी शिक्षण घेतले. तेथूनच त्यांच्या चळवळीला सुरुवात झाली. त्यांना स्वामी रामानंद तीर्थ, बेथुजी गुरुजी, चंद्रशेखर दादा वाजपेयी, नारायण काळदाते, दाजीबा देसाई, गोविंदभाई श्राफ अशा विचारवंताचा सहवास लाभला. त्यांनी मराठी भाषिकांसाठी एकीकरण समिती स्थापन केली. कर्नाटकात गेलेल्या मराठी भाषिक 865 गावासाठी अविरतपणे लढा चालवला.त्यामुळे त्यांना सीमालढ्याचे नायकही म्हटले जाते. अध्यक्षीय समारोप प्रसंगी मुख्याध्यापक सय्यद म्हणाले, बापूसाहेब पाटील यांनी सर्वप्रथम किसान शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. बहुजनांच्या मुलांना शिक्षण घेता यावे, त्यासाठी वसतीगृह स्थापले आणि अनेक शाळा व महाविद्यालय उभे केले. अशा शब्दात त्यांच्या कार्यावर त्यांनी प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे प्रास्तविक व पाहुण्यांचा परिचय प्रा.रामचंद्र घटकार यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सौ. गुडाप्पे आर. एस. यांनी केले.या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सौ.नारागडे के.पी,सौ. बिरादार के.के, सौ.कनकुरे एम.एम,सौ. गायकवाड पी.एन, सौ. येलाले के.व्ही., कुरुळेकर एस.एन, सुमयाँ तांबोळी, सौ. जवळे जे. आर, सौ. संगमवार एस.टी, सौ. भंडारे एस.जी, सौ. डावळे एम.ए, सौ. विशाखा कांबळे, मोमीन अजीज, जाधव रविप्रकाश, नाटकरे बालाजी, गायकवाड संजय, मैलारे एम.टी, पाटील राजकुमार, गायकवाड भीमकिरण, मळभागे शिवानंद, माधव वाघमारे, कासले वैभव, भोसले अभिजीत, विनित सूर्यवंशी, सौ. शेख ए. वाय ग्रंथपाल, श्रीमती बिरादार राजश्री त्यांच्यासह विद्यार्थी व जेष्ठ नागरिक, युवक, युवती उपस्थित होते.
