शेतीच्या वादावरून झाली होती हाणामारी !!दाखल गुन्ह्यात सवलतीसाठी पोलिसांनी मागितली चिरीमिरी !!

0
शेतीच्या वादावरून झाली होती हाणामारी !!दाखल गुन्ह्यात सवलतीसाठी पोलिसांनी मागितली चिरीमिरी !!

लातूर (ॲड. एल. पी. उगिले) लातूर जिल्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस उपाधीक्षक म्हणून संतोष बर्गे रुजू झाल्यापासून, लाचखोरीला बऱ्यापैकी आळा बसला आहे. मात्र तसे असले तरीही अजूनही पोलीस प्रशासनातील ती प्रवृत्ती पूर्णपणे गेली आहे, असे म्हणता येत नाही. याचे जिवंत उदाहरण म्हणून शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत असलेल्या पो.ना. दत्तात्रय उद्धव चामे यांच्या विरुद्ध झालेल्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईच्या प्रकरणाकडे पाहता येऊ शकेल.
लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका महिलेने आपल्या पती व त्यांचे सावत्र भाऊ शिवाजी तेलंग यांच्यामध्ये शेतीच्या वादावरून तक्रारदार यांच्या पतीस शिवाजी तेलंग यांनी मारहाण केल्याने त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन शिरूर आनंतपाळ येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदरील गुन्ह्यामध्ये शिवाजी तेलंग यांनी सदर भांडणाच्या कारणावरून तक्रारदार त्यांचे पती आणि तीन मुली यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये 23 जून रोजी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी लोकसेवक दत्तात्रेय उद्धव चामे व त्यांचे बीट अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल गिरी असे पंचनामा करण्यासाठी गावांमध्ये गेले होते. त्यावेळेस आरोपी लोकसेवक चामे यांनी तक्रारदार यांना त्यांच्याविरुद्ध दाखल अदाखलपात्र गुन्ह्यांमध्ये 107 ची कारवाई मध्ये मदत करण्यासाठी व तक्रारदार यांच्या मुलींची नावे अदखलपात्र गुन्ह्यांमधून कमी करण्यासाठी वीस हजार रुपये लाचेची मागणी केली, या बाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभाग लातूर येथे तक्रारदार यांनी 5 ऑगस्ट 2025 रोजी तोंडी तक्रार दिली होती. त्या तक्रारीनुसार लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 6 ऑगस्ट 2025 रोजी सदरील तक्रारीची पंच आणि साक्षीदार यांच्या समक्ष लाच मागणी पडताळणी केली असता, यातील आरोपी दत्तात्रय उद्धव चामे यांनी तक्रारदार यांच्याविरुद्ध दाखल अदखलपात्र गुन्ह्यांमध्ये 107 ची कारवाई मध्ये मदत करण्यासाठी व तक्रारदार यांच्या मुलींच्या नावे अदखलपात्र पुण्यामधून कमी करण्यासाठी, “तुमच्या खुशीने व मनाने काय द्यायचे ते द्या” असे म्हणून लाचेची मागणी पंच व साक्षीदार यांच्या समक्ष केली.
सदरील लाचेच्या मागणीची पडताळणी होताच दिनांक 6 ऑगस्ट रोजी सापळा कारवाईचे आयोजन करून, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपी लोकसेवक दत्तात्रय उद्धव चामे यांनी तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्यास सहमती दर्शवून सदर लाचेची रक्कम तहसील कार्यालय शिरूर अनंतपाळ कार्यालयासमोर रोडवर पंच साक्षीदारा समक्ष स्वतः स्वीकारली असता, त्यांना लाचेच्या रकमेसह रंगेहात पकडण्यात आले आहे.
लाच मागणीच्या आरोपात पकडल्यानंतर लोकसेवक आरोपी चामे यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडून पाच हजार रुपये रोख आणि ओप्पो कंपनीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या लातूर येथील राहत्या घराची ही झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासंदर्भात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी लोकसेवक दत्तात्रय उद्धव चामे यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन शिरूर अनंतपाळ येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील सापळा लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संजय तुंगार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथक मध्ये पोलीस उपाधीक्षक संतोष बर्गे, पोलीस निरीक्षक जगदीश राऊत आणि त्यांच्यासोबत सर्व सहकारी यांचा समावेश होता.
लातूर जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयातून शासनाने ठरवून दिलेल्या शुल्काव्यतिरिक्त जास्त पैसे मागणी केली जात असल्यास, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग लातूर यांच्या कार्यालयाशी संपर्क करावा. तक्रारदार किंवा माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल. असे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग लातूरचे पोलीस उपाधीक्षक संतोष बर्गे यांनी कळवले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!