विधी महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न..
नांदेड :- उध्दव सरोदे –
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या निर्देशानुसार नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालय नांदेड येथे
पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात पार पडला.यावेळी विचार मंचावर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे उप कुलसचिव डॉ.रवी सरोदे शैक्षणिक संलग्नता विभाग व माजी परीक्षा नियंत्रक तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारिणी सदस्य तथा व्यवस्थापन समिती सदस्य स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाची सुरुवात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन व विद्यापीठ गीताने होवून प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.विना पाटील यांनी करत त्यांनी महाविद्यालयाची यशस्वी शैक्षणिक वाटचाल,विद्यार्थ्यांची विधी शाखेतील उंच भरारी याबद्दल सविस्तर माहिती दिली.तर प्रमुख पाहुणे डॉ.रवी सरोदे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत म्हणाले की,विद्यार्थ्यांनी गुणात्मक शिक्षण घेत आई-वडिलांचे स्वप्न साकार करून सकारात्मक विचार जोपासत जीवनामध्ये यशस्वी,सज्ञान जबाबदार नागरिक बनावे असे आव्हान केले. श्री.नरेंद्र दादा चव्हाण यांनी अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलताना म्हणाले की, आधुनिक काळामध्ये विधी शाखेमध्ये सुवर्णसंधी आहेत त्याचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे व यशस्वी वकील होत महापुरुषांचा सामाजिक वारसा जोपासून आजच्या विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय केला पाहिजे असे नमूद केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.माधवी माळगे यांनी केले व मान्यवरांच्या मार्गदर्शना नंतर विद्यापीठ स्तरीय विधी शाखेतील यशस्वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.यात प्रामुख्याने विद्यापीठातून प्रथम आलेला शैलेश दिलीप भुतडा या विद्यार्थ्यास मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले तर विद्यापीठातून द्वितीय आलेला भास्कर शहाजी हस्सेकर व डीटीएल अभ्यासक्रमातून प्रथम आलेली प्रीती सतिश गौड यांचा समावेश होता.डॉ.चरणजीत सिंघ महाजन क्रीडा संचालक तथा पदवी वितरण समारंभाचे समन्वयक यांनी पदवी वितरण कार्यक्रमाचे आभार मानले.यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
