पी.एम.श्री.केंद्रीय विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांना स्काउट गाईडचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त

0
पी.एम.श्री.केंद्रीय विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांना स्काउट गाईडचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त

नांदेड (उध्दव सरोदे)

रेल्वे डिव्हीजन नांदेड येथील पी.एम. श्री.केंद्रीय विद्यालयातील पार्थ देशमुख आणि सम्यक कांबळे या दोन विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये भारत स्काऊट अँड गाईडचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळवून विद्यालयाचा गौरव वाढवला आहे.या दोन्ही विद्यार्थ्यांनी KV No.2 AFS पुणे येथे पार पडलेल्या सर्व चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण करून त्यांनी सामाजिक कार्य,शिस्त,साहसी मोहिमा आणि राष्ट्रसेवा यामध्ये उल्लेखनीय योगदान देऊन आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.या यशस्वी वाटचालीमध्ये स्काऊट मास्टर श्री.रवी सर यांचे सतत मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.दोन्हीं विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य श्री.अशोककुमार विश्वकर्मा आणि मुख्याध्यापक श्री.राम श्रृंगारे यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करताना म्हटले,“ही विद्यार्थ्यांच्या मेहनतीची आणि शिस्तप्रिय वृत्तीची साक्ष आहे,हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.” या गौरवप्राप्तीमुळे संपूर्ण विद्यालयात आनंदाचे वातावरण असून या यशाबद्दल दोन्हीं विद्यार्थ्यांचे विविध स्तरांवर कौतुक करण्यात येत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!