अर्धापूर न्यायालयात डॉ.अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी..
अर्धापूर (उध्दव सरोदे)
अधिवक्ता संघ अर्धापूरच्या वतीने न्यायालयात डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाची सुरुवात डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व विधिज्ञ व उपस्थितांनी करून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिवक्ता संघाचे सहसचिव ॲड.सचिन देशमुख पार्डीकर हे होते, तर प्रमुख उपस्थितीत अधिवक्ता संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य व नांदेड न्यायालयातील अधिवक्ता उपस्थित होते.यावेळी अधिवक्ता संघाचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.आर.जी.जोगदंड व कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.सचिन देशमुख पार्डीकर यांनी डॉ अण्णाभाऊ साठे यांचे जीवन,शिक्षण,परिस्थिती, त्यांनी लिहिलेल्या कथा,कादबऱ्यां, शाहिरी, पुस्तके आदिंच्या माध्यमातून त्यांनी केलेले समाज व जनतेला प्रबोधन या सर्व कार्याबाबत सविस्तरपणे मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिवक्ता संघाचे सदस्य ॲड.गौरव सरोदे यांनी केले.यावेळी सहाय्यक सरकारी अभिवक्ता ॲड.विशाल परदेशी, ॲड.डि.एम.लोणे, ॲड.जी.बी.पत्रे, ॲड.मंगेश सरोदे, ॲड.नितेश लोणे, ॲड.रोहित देशमुख, ॲड.ओंकार देवडे, ॲड. दिलीप मोरे व ईतर विधिज्ञांनी उपस्थित राहुन हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
