महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात झाडांना राख्या बांधून राखी पौर्णिमा साजरी
उदगीर (प्रतिनिधी) महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथील राष्ट्रीय सेवा योजना व महिला विकास कक्षाच्या वतीने राखी पौर्णिमेनिमित्त झाडांना राख्या बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यात आला, तसेच यावेळी महाविद्यालयात शिकत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी राखी बांधली. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, महिला विकास कक्ष प्रमुख डॉ. एस. जी. अन्सारी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. बी. एस. होकरणे, पर्यावरण विभाग प्रमुख डॉ. जयप्रकाश पटवारी, विनय नागपूर्णे तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
