रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलला विविध पुरस्कारांनी सन्मानीत
उदगीर (प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलने सन २०२४-२५ या वर्षभरात केलेल्या कार्याबद्दल रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या वतीने जालना येथे आयोजित कार्यक्रमात विविध पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलने सन २०२४-२५ या वर्षभरात वृक्षारोपण, राष्ट्राचे शिल्पकार पुरस्कार, नारी शक्ती पुरस्कार, शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, शालेय विद्यार्थिनीची अँनिमिया तपासणी, रक्तदान शिबीर, डिजिटल शाळा, आंनदी शाळा, उत्कृष्ट व्यवसाय पुरस्कार असे अनेक विविध सामाजिक उपक्रम राबवून रोटरी क्लबला सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. उदगीर रोटरीच्या या कार्याबद्दल २०२४-२५ चे प्रांतपाल डॉ. सुरेश साबू, रो. निर्मला साबू, नूतन प्रांतपाल सुधीर लातुरे व सौ. संगीता लातुरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी उत्कृष्ट अध्यक्ष, अनिमिया तपासणी बेस्ट प्रोजेक्ट, बेस्ट पर्मनंट प्रोजेक्ट, रोटरॅक्ट क्लबला प्रोत्साहन दिल्याबद्दल बेस्ट क्लब असे विविध पुरस्कार रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलला मिळाले आहेत.
यावेळी उदगीर रोटरी क्लबच्या मावळत्या अध्यक्षा सरस्वती चौधरी, सचिव ज्योती चौधरी व माजी अध्यक्षा महानंदा सोनटक्के यांनी पुरस्कार स्विकारला.
