देश हितासाठी चांगली पिढी घडवण्याचे कार्य गुरुकुलच्या माध्यमातून व्हावे – आ. संजय बनसोडे

0
देश हितासाठी चांगली पिढी घडवण्याचे कार्य गुरुकुलच्या माध्यमातून व्हावे - आ. संजय बनसोडे

उदगीर (एल पी उगिले) : मतदार संघातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सर्वेतोपरी आपण मदत करणार असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून उदगीर शहरात लिंगायत मुलांचे वसतीगृह गुरुकुलची उभारणी करत आहोत. देशाच्या उज्वल भवितव्यासाठी आणि देश हितासाठी चांगली पिढी घडवण्याचे कार्य या वस्तीगृह गुरुकुलच्या माध्यमातून होणार असल्याचे मत माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी केले.

ते उदगीर येथील शिवबा नगर येथे उभारण्यात येत असलेल्या लिंगायत मुलांचे वसतीगह ( गुरुकुल ) च्या भुमीपुजन सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
यावेळी हिरमेठ संस्थानचे प्रमुख प.पु. डाॅ.बसवलिंग पट्टदेवरु, महालिंग महास्वामी, बसवलिंग गुरुजी, रमेश अंबरखाने, रामेश्वर निटुरे, रतिकांत अंबेसंगे, श्याम डावळे, शशिकांत बनसोडे, बाळासाहेब पाटोदे, ज्ञानेश्वर पाटील, संजय तोगरीकर, चंदर पाटील, बाबुराव पांढरे, बी.एम. बिरादार, सुरेश समगे, विदेश पाटील, नीळकंठ बिरादार, शिवकुमार पांडे, डाॅ.अशोक देवंग्रे, अमोल बिरादार, आशिष हंगरगे,गुरुप्रसाद लोणारे, दिपक महालिंगे, देवेंद्र श्रीगिरी, अजित फुलारी, जयश्री कनाडे, संगिता शिंदे, गंगु मसुरे, अर्चना गाडे, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, लिंगायत मुलांचे वसतिगृह ( गुरुकुल ) च्या उभारणीसाठी १ कोटीचा निधी मंजूर केला असुन यामध्ये जी प्लस फोर अशा प्रकारची इमारत उभारली जाणार आहे. निधी कमी पडला तर वाढीव निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आ. संजय बनसोडे यांनी दिली आहे.
या परिसरातील हजारो विद्यार्थी गुरुकुल मध्ये शिक्षण घेवुन समाजाला दिशा देण्याचे कार्य या वसतीगृहातील विद्यार्थी करतील. असा विश्वास आ. बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी उदगीरसह परिसरातील नागरीक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!