माणिक कांबळे यांच्या उडान ग्रंथाचे प्रकाशन व सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

0
माणिक कांबळे यांच्या उडान ग्रंथाचे प्रकाशन व सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

उदगीर (प्रतिनिधी) तालुक्यातील
स्वा. सावरकर माध्यमिक विद्यालय, सुकणी येथिल शिक्षक माणिक कांबळे संपादीत उड़ान ग्रंथाचा प्रकाशन सोहळा व सेवापूर्ती गौरव सोहळा थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. नारायण कांबळे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. सतीश यादव,
साहित्यिक तथा पोलीस उपनिरीक्षक मुरारी गायकवाड, कांता कांबळे, उजळंबच्या सरपंच सौ. वर्षाताई इंद्राळे, उपसरपंच सौ. सुरेखा मुहुँ ,
विद्यासागर डोरनाळीकर . महेश पाठोदकर ,डॉ. वामन कारखाने,संगम निला,प्रा. शिवाजीराव देवनाळे, प्रा. विष्णु जोंधळे प्रा. बिभिषन मद्देवाड, धनाजी लोडकटे, प्रा. सुधीर पोतदार, भागवतअण्णा केंद्रे, नरसिंगजी घुगे,पांडुरंग मुळे आदी उपस्थित होते. माणिक कांबळे यांनी 31 वर्ष सुकनी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालयात अध्यापनाचे काम केले. निवृत्तीनंतरही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरतील अशा बोधकथा उड्डाण या कथासंग्रहातून संकलित केल्या असून याचा फायदा निश्चितच विद्यार्थ्यांना होणार आहे.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा डाॅ मारोती कसाब यांनी केले , मानपत्राचे वाचन डाॅ व्यकंट सुर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन सतिश नाईकवाडे ,व्यंकटेश उजळंबकर यांनी केले. यावेळी साहित्य क्षेत्रातील मान्यवर तसेच माणिक कांबळे यांचा सहकारी वर्ग व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!