अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा स्थापना दिवस साजरा
उदगीर (प्रतिनिधी) येथील सुलोचना देवी पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन उदगीर शाखेचे कार्याध्यक्ष प्राचार्य विजयकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा छत्तीसावा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी शाखेचे उपाध्यक्ष बाबूराव माशाळकर, सचिव शिरीष रोडगे ,
जिल्हा शाखेचे प्रधान सचिव प्रा.डॉ. बळीराम भुक्तरे , उपाध्यक्ष विश्वनाथ मुडपे व विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर, विश्वनाथ मुडपे यांनी डॉ. दाभोळकर जोमाने चालवू पुढे चळवळ हे गीत सादर केले.
जिल्ह सचिव प्रा.डॉ.बळीराम भुक्तरे यांनी चमत्काराच्या प्रयोगाचे सादरीकरण केले व अनिसची भूमिका मांडली.उपाध्यक्ष बाबूराव माशाळकर यांनी अनिसची पंचसूत्री सांगितली. अध्यक्षिय समारोप प्राचार्य विजयकुमार पाटील यांनी केला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव शिरीष रोडगे, सहशिक्षक जाधव व श्रीमती बावगे यांनी सहकार्य केले.आभार सहशिक्षक बिरादार यांनी मानले
