आनंद उत्सव शिबिर: तणावमुक्त जीवनासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचा उपक्रम

0
आनंद उत्सव शिबिर: तणावमुक्त जीवनासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचा उपक्रम

पोलीस फ्लॅश न्यूज अहमदपूर ( गोविंद काळे ) आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे देशभरात १२ ते १७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ‘आनंद उत्सव’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा मुख्य उद्देश लोकांना तणावमुक्त आणि आनंदी जीवन जगण्यासाठी मदत करणे हा आहे. विशेष म्हणजे, या शिबिराला पूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे ऑनलाइन मार्गदर्शन मिळणार आहे.
हे शिबिर अहमदपूर येथील सावता माळी मंगल कार्यालयात नांदेड-लातूर बायपास रोडवर होणार आहे. हे शिबिर दोन बॅचमध्ये आयोजित करण्यात आले आहे. पहिली बॅच सकाळी ६ ते ८.३० वाजेपर्यंत तर दुसरी बॅच सायंकाळी ६ ते ८.३० या वेळेत असेल.
या शिबिरात सहभागी होणाऱ्यांना सुदर्शन क्रिया, प्राणायाम आणि ध्यान शिकायला मिळेल. सुदर्शन क्रिया ही श्वासावर आधारित एक प्रभावी पद्धत आहे, जी जगभरातील कोट्यवधी लोकांनी अनुभवली आहे. नियमित सरावाने जीवनात सकारात्मकता, उत्साह, प्रेम आणि सर्जनशीलता वाढण्यास मदत होते, ज्यामुळे आपले जीवन अधिक आनंदी होते.
या शिबिराचा लाभ घेण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी तुम्ही खालील क्रमांकांवर संपर्क साधू शकता:

  • पुष्पा दोडके: ८४२१३१४५९९
  • भरत इगे: ९४२२४७२१३९
  • अमोल फुलारी: ९६३७५७६७३७
  • महेश लोहारे: ९४२२६५७९७८
  • अनिल सांगवीकर: ७५८८३८९८६९
    अहमदपूरकरांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन तणावमुक्त जीवनाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने करण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!