सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड
अहमदपूर( गोविंद काळे ) हिंगोली येथे होणाऱ्या २७ व्या सब-ज्युनियर राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यामध्ये ऋषिकेश भीमराव पोले आणि आनंदी मनोज कदम यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात झालेल्या निवड चाचणीमध्ये ऋषिकेश पोले याने ईपी श्रेणीत रौप्य पदक पटकावले, तर आनंदी कदम हिने फाईल श्रेणीत सुवर्णपदक जिंकले. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल श्री. गणेश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गणेशदादा हाके पाटील, सचिव रेखाताई हाके पाटील, तसेच शाळेचे संचालक कुलदीप हाके पाटील, संचालिका शिवालिका कुलदीप हाके पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
यासोबतच लातूर जिल्हा तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष प्रा. डॉ. अभिजीत मोरे, सचिव प्रा. दत्ता गलाले, मुख्याध्यापक हरिदास सर आणि शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या खेळाडूंना घडवण्यासाठी क्रीडा शिक्षक आकाश अरुण बनसोडे आणि मोसिन मोबीन अहमद शेख यांनी विशेष मेहनत घेतली.
