उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आक्रोश अंदोलन गाढव मोर्चा
अहमदपूर ( गोविंद काळे )
अहमदपूर तालूक्यातील विविध प्रलंबीत प्रश्नांच्या संबंधाने वारंवार पाठपूरावा करून सूध्दा तालूका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून या सर्व विकास प्रश्न समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सम्राट मित्र मंडळाच्या वतीने युवकनेते डॉ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश अंदोलन गाढव मोर्चा धडकला.
या मोर्चाची सूरूवात नगर परिषद मैदान येवून करण्यात येवून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा,भीम नगर,आझाद चौक,मेन रोडवरून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून उपजिल्हाधिकारी कार्यालयावर येवून मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.
प्रामुख्याने उपजिल्हा रूग्णालय मंजूर करावे,स.नं.4 चे प्रलंबित कबालनामे वाटप करावेत,बेघरांचा सर्व्हे करून पाच हजार घरे मंजूर करून वाटप करावेत,तक्षशिला बुध्द विहाराकडे जाणारे रस्ते मंजूर करावेत,
चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती युवकनेते डॉ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशयांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.अहमदपूर तालूक्यातील अनेक गावामध्ये स्वतःच्या उपजिविकेसाठी गायरान ताब्यात घेवून शेती करतात त्यांच्या नांवे जमीनीचे पट्टे करावेत,अनेक गावात सार्वजनिक स्मशानभूमी नाहीत तसेच दलित समाजासाठी स्मशानभूमी नाहीत त्या तातडीने मंजूर कराव्यात,निराधार अपंग परितक्त्या यांना शासनाचे नियमीत अनुदान चालू करावे,जुजबी कारणाने बंद केलेले अनूदान चालू करावेत,21 हजाराचे उत्पन्न प्रमाणपत्र देवून गरजूंना या योजनेचा लाभ देण्यात यावा,अहमदपूर शहरातील घनकचरा व्यवस्थापनावर काम करणाऱ्या मजुरांचे गेल्या 17 महिन्यांपासून थकीत असलेली पगार देण्यात यावे,अहमदपूर स.नं.4 वरील अतिक्रमण धारकांना कबालनामे दिले मात्र याची नोंद न.प. मालमत्ता रजिस्टरवर घेतली नाही परिणामी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत त्यांचे फाॅर्म भरले गेले नाहीत या सर्वांचे फाॅर्म भरून घ्यावेत.शहरात शासनाचा निधी समान प्रमाणात वाटप करण्यात यावा,शहर स्वच्छतेचे काम नियमीत पणे करण्यात यावे,एमआयडीसी परिसरात रहाणाऱ्या भटक्या विमुक्त लोकांना घरकूल मंजूर करावेत, ग्रामीण रूग्णालयातील ट्रामा केअर सेंटर पूर्ण क्षमतेने चालू करावे,ब्लड स्टोरेज केंद्र चालू करावे,उस्मान बी अफ्फान शाळेला संरक्षण भिंत बांधावी,इदगाह मैदान या ठिकाणी चार हायमास्ट मिनीमाष्ट लाईट मंजूर करावेत,रमाई घरकूलाच्या अनुदानात वाढ करावी,अहमदपूर बसस्थानकासमोरील नवीन शौचालय तातडीने सूरूवात करावे,मालमत्ता रजिस्टरवर नोंद करण्यासाठी नागरिकांकडून अन्यायकारक 3% रक्कम वसूल करण्यात येवू नये,अहमदपूर शहरातील सर्व जातीतील गोर गरीब बेघरांचा सर्व्हे करून पाच हजार घरे मंजूर करावेत आणी बेघरांना ते वाटप करावेत,सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र न वळवता तो पूर्ववत विभागास परत द्यावा,मौजे परचंडा,गंगाहिप्परगा,उजना,सिंदगी खुर्द, सूमठाणा, गूगदळ,हगदळ,लांजी,पाटोदा,तीर्थ,किनी कद्दू,
मूळकी, वंजारवाडी,सांगवी सु.उमरगा इत्यादी गायरान अतिक्रमण धारकांचे पीक पंचनामे करून एक ई रजिस्टला नोंद घेण्यात यावी,धानोरा खू. येथील बौध्द मातंग समाजासाठी स्मशानभूमी शेड मंजूर करावे,सिद्धार्थ नगर येथील आनंद बुध्द विहार भूसंपादनासाठी निधी मंजूर करावा व सामाजिक सभागृहासाठी निधी मंजूर करावा,शिरूरताजबंद येथील अजहर शेख यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून नऊ जणांचे प्राण वाचविले याचा राज्य राष्ट्रीय स्तरावर सन्मान करावा. यासह अनेक ज्वलंत प्रलंबित विषय या आक्रोश अंदोलन गाढव मोर्चा मध्ये मांडण्यात आले.
या मोर्चामध्ये माजी मंत्री विनायकराव पाटील,आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते गोपीनाथराव जोंधळे,माजी नगराध्यक्ष सरस्वतीबाई कांबळे,अण्णाराव सूर्यवंशी, माजी जि.प.सदस्य माधवराव जाधव,सोमेश्वरभाऊ कदम,शेख रहीमभाई, जाबेरभाई पठाण,सय्यद तबरेजभाई,बाळासाहेब आगलावे,ससाणे भगवानराव,प्रशांत जाभाडे,
जगन्नाथ मामडगे,तालूकाध्यक्ष शरद सोनकांबळे,शरद कांबळे,बालाजी ढवळे,सचिन बानाटे, संतोष गायकवाड, डाॅ.बालाजी थिट्टे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
