प्राची चंद्रशेखर भालेराव नवोदय प्रवेशास पात्र
अहमदपूर (गोविंद काळे) – येथील किलबील नॅशनल स्कूलची इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कु. प्राची चंद्रशेखर भालेराव हिची जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून कौतुक होत आहे.
प्राचीने नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण करून हे यश संपादन केले आहे. तिच्या या कामगिरीमुळे किलबील नॅशनल स्कूल आणि भालेराव कुटुंबियांचा गौरव वाढला आहे. तिच्या यशाबद्दल सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. ऋषीकेश पाटील, किलबील नॅशनल स्कूलचे संस्थापक ज्ञानोबा भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजहरभाई बागवान, उद्योजक प्रशांतभाऊ घाटोळ, इंजिनिअर संदीप शिंगाडे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा कोषाध्यक्ष एम. एन. क्षीरसागर, बळीभाऊ मोरे, बाबासाहेब कांबळे (लेंडेगावकर) यांच्यासह अनेकांनी तिचे अभिनंदन केले आहे.
प्राचीला या परीक्षेत यश मिळवण्यासाठी गणेश जाधव सरांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
