राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत लातूरच्या खेळाडूंचे यश

0
राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत लातूरच्या खेळाडूंचे यश

अहमदपूर ( गोविंद काळे ) महाराष्ट्र तलवारबाजी संघटना आणि हिंगोली जिल्हा तलवारबाजी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ८ ते १० ऑगस्ट २०२५ दरम्यान हिंगोली येथे २७ वी महाराष्ट्र राज्यस्तरीय सब-ज्युनियर तलवारबाजी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत पदकांची कमाई केली आहे.
वेदांत माने याने मुलांच्या ईपी वैयक्तिक गटात रौप्य पदक पटकावले, तर मुलींच्या ईपी वैयक्तिक गटात भक्ती बिरादार हिने देखील रौप्य पदकाची कमाई केली. या दोन्ही खेळाडूंची निवड आता राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे.
या व्यतिरिक्त, ईपी सांघिक गटात लातूरच्या खेळाडूंनी आपली ताकद दाखवून दिली. वेदांत माने, ऋषिकेश पोले, जैद खान पठाण आणि ओमराज पौळ या संघाने कांस्य पदक जिंकले.
या सर्व यशस्वी खेळाडूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रा. दत्ता गलाले, वजीरोद्दीन काजी, मोसीन शेख, रोहित गलाले आणि आकाश बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल शिवछत्रपती क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त गणपतराव माने, लातूर तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष अभिजित मोरे, प्रशांत माने, संतोष कदम, वैभव काजेवाड, मेहफुज खान पठाण यांच्यासह लातूरच्या सर्व क्रीडाप्रेमींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!