लातूर शहर ग्रीन कव्हर निर्माण करण्यासाठी महानगरपालिकेसोबत मराठा सेवा संघ वृक्षारोपण व श्रमदान करणार : प्रा. सुनिल नावाडे

लातूर शहर ग्रीन कव्हर निर्माण करण्यासाठी महानगरपालिकेसोबत मराठा सेवा संघ वृक्षारोपण व श्रमदान करणार : प्रा. सुनिल नावाडे

लातूर (प्रतिनिधी) : मनपा हद्दीमध्ये किमान 33 टक्के ग्रीन कव्हर असावे या संकल्पनेला मदत व्हावी या हेतूने लातूर शहराच्या विकासासाठी सामाजिक उपक्रमामध्ये मराठा सेवा संघ लातूर जिल्हा पदाधिकारी सहभागी होवून शहरामध्ये श्रमदान करणार यासाठी मराठा सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष सुनिल नावाडे यांच्या उपस्थितीत टीमने महापालिका आयुक्‍तांना पत्र देऊन शासन उपक्रमामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला असून मराठा सेवा संघ लातूर शहर ग्रिन कव्हर निर्माण करण्यासाठी महापालिकेसोबत वृक्षारोपन व श्रमदान करणार असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुनिल नावाडे यांनी दिली.

लातूर शहराच्या सर्वांगिण विकास आराखड्यात सामाजिक जबाबदारी समजून वार्डनिहाय सर्व सभासद, पदाधिकारी यामध्ये दररोज श्रमदान करुन महानगर पालिकेला मदत करतील. नुकतेच जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहराच्या विकासासाठी विकास आराखडा तयार करुन प्रामुख्याने मनपा हद्दीत 33 टक्के ग्रीन करण्यासाठी वृक्ष लागवड करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. लातूर मनपाच्यावतीने महापौर विक्रांत गोजमगुंडे, आयुक्‍त टेंकाळेसाहेब यांच्या संकल्पीत आराखड्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून लातूर शहराच्या निरोगी प्रदूषणमुक्‍त वातावरण निर्मितीसाठी फक्‍त प्रशासनाची जबाबदारी नाही तर सामाजिक संघटनांची जबाबदारी म्हणून मराठा सेवा संघ लातूर या कार्यात प्रत्यक्षात सहभागी होवून प्रशासनाला सहकार्य करण्याच्या हेतूने श्रमदान करणार आहेत. या संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाबरोबरच लोकसहभाग असणे अतिशय आवश्यक आहे. सामाजिक बांधिलकी व प्रशासनाला सहकार्य या हेतूने वृक्ष लागवड, संगोपण, संरक्षण या कार्यात मराठा सेवा संघ, लातूर गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे. यापुढेही प्रशासनाच्या सहकार्याने महानगरपालिका हद्दीमध्ये ग्रीन कव्हर करण्यासाठी मराठा सेवा संघाचा सक्रीय सहभाग असणार आहे. यामध्ये मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष खंडेराव गंगणे, प्रविण देशमुख, आम्रपाली सुरवसे, अमर गुंजोटे, अनंत सूर्यवंशी, संभाजी नवगिरे, विवेक सौताडेकर, बाळासाहेब जाधव, बोराडेताई, रंजनाताई चव्हाण, कल्पनाताई पवार आदींचा सहभाग राहणार आहेत.

About The Author