प्रभू रामचंद्र मंदिरासाठी कव्हेकर परिवारातर्फे 51 हजाराची निधी

प्रभू रामचंद्र मंदिरासाठी कव्हेकर परिवारातर्फे 51 हजाराची निधी

लातूर (प्रतिनिधी) : भारतातील नव्हे तर जगातील मानवांचे श्रध्दास्थान असलेले प्रभू रामचंंद्र यांचे भव्य मंदिर अयोध्या येथे बांधण्याच्या कामाला सुरूवात झालेली आहे. यासाठी सर्व देशातून बांधकाम निधी जमाविला जात आहे. या कामासाठी भाजपाचे नेते मा.आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर परिवारातर्फे निधी संकलन समिती प्रमुख राहुल देशपांडे यांना पद्मभूषण मा.डॉ.अशोककाका कुकडे यांच्या शुभहस्ते 51 हजाराचा धनादेश सोपविण्यात आला.यावेळी जेएसपीएमचे समन्वयक निळकंठराव पवार, शहर कार्यवाहक अनिल कुलकर्णी, बसवेश्‍वर नगरीचे पालक अनिल जवळेकर, हे उपस्थित होते. कृषी विषयासंदर्भातील लेखाबद्दल डॉ. कुकडे काका यांच्याकडून कौतुक केंद्र सरकारने कृषी कायदे केले, ते तिनीही कायदे शेतकरी हिताचे असून शेतकर्‍यांला आर्थिक सुबकता व स्थैर्य देणारे आहेत. या बरोबरच गेल्या 15 वर्षापासून कृषीच्या विविध विषयावर जागतिक स्थरापासून ते गावपातळीपर्यंची मुद्देसुद माहिती“विचार संवाद ” या अत्यंत उत्कृष्ठ पुस्तकामध्ये दिली. याबरोबरच मराठवाडा विकास परिषद व इतर अभ्यासपूर्ण लेखाबद्दल पद्मभूषण डॉ.अशोक कुकडे काका यांनी शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचे कौतुक केले. त्याबद्दल कव्हेकरांनी डॉ.कुकडे यांचे शतषः आभार मानले असल्याचे माजी आ.कव्हेकर यांनी सांगितले.

About The Author

error: Content is protected !!