ग्रंथपालांनी ग्रंथालयाच्या पंचपदीचा उपयोग करावा – ग्रंथ मित्र सूर्यकांत शिरसे

0
ग्रंथपालांनी ग्रंथालयाच्या पंचपदीचा उपयोग करावा - ग्रंथ मित्र सूर्यकांत शिरसे

उदगीर (प्रतिनिधी)
सार्वजनिक ग्रंथालयाच्या ग्रंथपालांनी डॉ. शि.रा. रंगनाथन यांनी ठरवून दिलेल्या पंचपदीचा वापर करावा. अर्थात ग्रंथ हे उपयोगासाठी आहेत, प्रत्येक वाचकाला त्याच्या आवडीचा ग्रंथ मिळाला पाहिजे, तसेच प्रत्येक ग्रंथाला वाचक मिळाला पाहिजे. ग्रंथालयात वाचकाचा वेळ वाचला पाहिजे, ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे. या पंचपदीचा वापर केल्यास प्रभावीपणे कार्य होऊ शकेल, आणि वाचन संस्कृती समृद्ध होईल. असे विचार जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक ग्रंथ मित्र सूर्यकांत शिरसे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर नगर परिषदेच्या हुतात्मा स्मारक सार्वजनिक वाचनालयात डॉ. एस आर रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी महेश शिंदे हे होते, तर प्रमुख उपस्थितांमध्ये सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय शेकापूरचे अध्यक्ष लक्ष्मण फुलारी (भालके), नगर परिषदेचे हिशोबनीस महेश कवठे, महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल माधव भोसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना सूर्यकांत शिरसे यांनी समाजाची जडणघडण होण्यासाठी वाचन संस्कृती समृद्ध झाली पाहिजे, आणि वाचन संस्कृतीला बळ देण्याचे काम सार्वजनिक ग्रंथालयाच्या माध्यमातून प्रभावीपणे होऊ शकते, याचे भान आणि जाण ग्रंथपालांनी ठेवणे गरजेचे आहे. डॉ. शि.रा. रंगनाथन यांनी ग्रंथालय शास्त्राचा सखोल अभ्यास करून सार्वजनिक ग्रंथालयांना गतिमान करण्यासाठी नियमावली बनवली. त्यामुळे त्यांना ग्रंथालयाचे जनक असे म्हणतात. सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना तोकड्या मानधनावर काम करावे लागते, मात्र परिस्थिती आज ना उद्या बदलेल. हे काम एक सामाजिक जबाबदारी आहे. या दृष्टीने सर्वांनी सामाजिक बांधिलकी म्हणून काम करावे, असे आवाहन ही सूर्यकांत शिरसे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन ग्रंथपाल ज्ञानेश्वर पारसेवार यांनी केले.
याप्रसंगी इंजिनियर लोखंडे, संदीप कानमंदे, संजय शिरसागर, सचिन पारखे तसेच ग्रंथालय कर्मचारी सुजाता बिराजदार, कृष्णा कांबळे, संगम गायकवाड हेही उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!