जळकोट येथे विद्यापीठ स्तरीय हिंदी विषयाची कार्यशाळा संपन्न
उदगीर (प्रतिनिधी)उदगीर विधानसभा मतदारसंघातील जळकोट येथील संभाजीराव केंद्रे महाविद्यालय जळकोट व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय हिंदी विषयाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या हिंदी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.सुजितसिंह परिहार यांच्या शुभहस्ते व प्रमुख अतिथी डॉ. संजय नरवाडे, प्राचार्य डॉ.बबन बोडके, डॉ. मनोहर भंडारे, डॅा. शिवाजी वडचकर , प्राचार्य डॅा. बाबुराव लहाने . प्रा. डॉ. व्यंकट पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.पुढे बोलताना डॉ. सुजीतसिंह परिहार म्हणाले एन. ई. पी. नवीन राष्ट्रीय शैक्षणीक धोरण च्या अनुषंगाने विद्यार्थी पदवी अभ्यासक्रम पुर्ण करून बाहेर पडणार आहे.
नवीन अभ्यासक्रम सुरू होताना संक्रमणाचा काळ असतो . या कालावधीत समस्यांना तोंड देत सामोरे जावे लागते.2028 – 29 पर्यंत कोणत्याही प्राध्यापकांना कार्यभाराची चिंता नसावी असेही ते म्हणाले.
नवीन अभ्यासक्रमा संदर्भात समस्या जरूर आहेत. पण सदभावना सुद्धा खुप आहे. विद्यार्थी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडेल, त्यानंतर चिंता करण्याची गरज नाही .
विद्यापीठ स्तरावर दर 5 वर्षानंतर अभ्यासक्रम बदलत असतो. त्यामुळे आपण आता चिंता करण्याची गरज नाही .
यास अधिक प्रभावीपणे पुढे घेऊन जाऊ या. उद्भवलेल्या समस्याचे निराकरण करूया, विद्यापीठ स्तरावरील वेळोवेळी बदलाची माहिती आपल्या पर्यंत पोहचवली जाईल. असे आश्वासन डॉ सुजीतसिंह परिहार यानी दिले .
प्रास्ताविकात या कार्यशाळेचे संयोजक प्रा. डॉ. विजय कल्लूरकर यांनी मागील 25 वर्षापासून सुरू झालेले हे छोटेसे रोपटे आज वटवृक्षात रुपांतर होतांना दिसून येत आहे. या शैक्षणिक संकुलात २५ प्राध्यापकांनी पीएच. डी. पदवी प्राप्त केली आहे. ११ प्राध्यापकांना मायनर प्रोजेक्ट विद्यापीठाने मंजूर केला आहे. ३ प्राध्यापकांना भारत सरकार कडून डिझायन पेटंट मिळाले आहे. 5 प्राध्यापक प्रोफेसर झाले असून, गुणवत्तेचा आलेख सतत वाढत आहे . एकनिष्ठ भावनेने विद्यार्थ्याच्या शैक्षणिक उन्नतीचे काम या परिसरातून अविरत होत आहे. विविध उपक्रम विद्यार्थ्यासाठी आयोजित करण्यात येतात, असे सांगितले.
अध्यक्षीय समारोप करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. टी. लहाने म्हणाले की, आपण पाहतोय हिन्दी भाषेला विरोध चालू आहे.
देशाची एक राष्ट्रभाषा आणि या राष्ट्रभाषेलाच विरोध करणे कितपत योग्य आहे.सबंध राष्ट्रीय स्तरावर हिन्दी खूप गोड भाषा आहे.चिंतन – मंथन आशा विचार मंचावरून होणे गरजेचे आहे.दुपारच्या सत्रात हिन्दी विषयाचे अभ्यास मंडळाचे तज्ञ प्राचार्य डॉ बबन बोडके, डॉ संजय नरवडे , डॉ मनोहर भंडारे, डॉ संजय वडचकर आदी हिंदी अभ्यास मंडळाच्या सदस्यानी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने या व्दितीय वर्षाच्या हिन्दी विषयाचे अभ्यासक्रम बदललेल्या नवीन अभ्यासक्रमावर सविस्तर माहिती या कार्यशाळेच्या माध्यमातून देण्यात आली . यावेळी हिंगोली, नांदेड, परभणी , लातूर जिल्ह्यातील प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. डॉ. मनिषा देशपांडे , प्रस्ताविक संयोजक डॅा विजयकुमार कलूरकर यांनी केले तर, आभार सह -संयोजक डॉ. जितेंद्र शेळके यांनी मानले.
