सहकारमहर्षी चंद्रकांत आण्णा वैजापूरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न
उदगीर (प्रतिनिधी) येथील
सहकारमहर्षी चंद्रकांत आण्णा वैजापूरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्रीकांत पाटील मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
उदगीर येथील महातपस्वी कुमारस्वामी महाराजाच्या चरणी आपल्या गुरूच्या आरोग्य व ऐश्वर्यसंपन्न जीवनासाठी मनोकामना केली,व हजरत खाजा बादशाह सजरोदिन दर्ग्यात आगामी काळात येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी व दीर्घायुष्यासाठी दूवा मागितली, तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पाठयपुस्तक, पेन, पेन्सिल अशा शैक्षणिक वस्तू सोबतच खाऊ वाटप करण्यात आला.शहरातील विविध धर्मीयांच्या प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी प्रार्थना करून सामाजिक सलोखा निर्माण करून कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केले. श्रीकांत पाटील व सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या आदर्श व्यक्तिमत्त्वाचा वाढदिवस मिठाई वाटूनही साजरा केला.
यावेळी श्रीकांत पाटील व श्रीकांत पाटील मित्रमडंळाचे अध्यक्ष सचिन वाघमारे,उपाध्यक्ष प्रविन पटवारी, सचिव प्रा.संजय जामकर,कोषाध्यक्ष पवन सुर्यवंशी,प्रशांत हुडगे,प्रशांत खडके,विजय भोसले,अविनाश खरात, सतीश बिरादार,मंगेश येरकुंडे,सोहम रेकुळवाड इत्यादी पदाधिकाऱ्यांसह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
