तिरू प्रकल्पावरील उजवा व डाव्या कालव्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आश्वासन

0
तिरू प्रकल्पावरील उजवा व डाव्या कालव्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आश्वासन

उदगीर (प्रतिनिधी) : जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माजी क्रीडा मंत्री तथा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे हे सतत प्रयत्नशील आहेत .
मतदारसंघामध्ये असलेल्या तिरू मध्यम प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या या दोन्ही कालव्यांची अवस्था खराब झाल्याचे आ.संजय बनसोडे यांच्या लक्षात येताच शेतकऱ्यांना सिंचना साठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी कालवा बांधकाम दुरूस्ती व कालवा अस्तरीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे माजी क्रीडामंत्री आ.संजय बनसोडे यांनी केली होती. त्या अनुषगांने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा मंत्र्याना सुचना दिली.त्या अनुषंगाने मुंबईत राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाची विशेष बैठक घेवुन तिरु मध्यम प्रकल्पाचे बांधकाम हे १९७६ साली झाले असुन मागील ५० वर्षामध्ये हा तलाव ३१ वेळा पूर्णपणे भरला आहे. धरणाचे सिंचन क्षेत्र २३४८ हेक्टर असुन तलावास उजवा व डावा कालवा असे दोन कालवे आहेत. त्याची दुरुस्ती केली तर याचा फायदा या भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार असून यासाठी लागणारा कोट्यावधी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाला लवकरच तत्वत: मान्यता देण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीत दिले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!