शास्त्री प्राथमिक शाळेत हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत ध्वजारोहण व क्रांती सप्ताहाचे पाचवे पुष्प संपन्न.

0
शास्त्री प्राथमिक शाळेत हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत ध्वजारोहण व क्रांती सप्ताहाचे पाचवे पुष्प संपन्न.

उदगीर (प्रतिनिधी): भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लाल बहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालय हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत उपक्रमांतर्गत बालवाडी सदस्या सुलभाताई कुलकर्णी यांच्या शुभहस्ते प्रमुख ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.याप्रसंगी बालवाडी अध्यक्ष अंजलीताई नळगीरकर,शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे, शालेय समिती सदस्य डॉ.प्रकाश येरमे,शालेय समिती शिक्षक प्रतिनिधी सौ.भाग्यश्री स्वामी मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे व विभाग प्रमुख सुधाकर पोलावार उपस्थित होते.
क्रांती सप्ताहाच्या पाचव्या पुष्पासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सचिन सानप उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर बालवाडी अध्यक्ष अंजलीताई नळदुर्ग शालेय समिती सदस्य डॉ. प्रकाश येरमे विभाग प्रमुख सुधाकर पोलावर उपस्थित होते. मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे सचिन आगलावे यांनी क्रांतीकारक भगतसिंग,राजगुरू व सुखदेव यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.त्यांनी केलेल्या कार्याविषयी व पराक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे यांनी सर्व विद्यार्थ्यांनी भगतसिंग,सुखदेव व राजगुरू यांच्याप्रमाणे देशसेवा करावी. त्यांच्या विषयीचे साहित्य मिळवून वाचण्याचे आवाहन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!