जीवन विकास मतिमंद कर्मशाळेत गणवेशाचे वाटप

0
जीवन विकास मतिमंद कर्मशाळेत गणवेशाचे वाटप

उदगीर (प्रतिनिधी) येथील संधी निकेतन शिक्षण संस्था वडगाव संचलित जीवन विकास निवासी मतिमंद कर्मशाळेत ‘आजादी का अमृत महोत्सव’ निमित्त ध्वजारोहण कार्यक्रम करून सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त गणवेश वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जीवन विमा निगम चे विकास अधिकारी सुनील कोळी, उदगीर येथील प्रसिद्ध व्यापारी संतोष पाटील व अजय हजारे हे लाभले होते. पाहुण्यांनी कर्मशाळेच्या विद्यार्थ्यांचे व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले,आणि अशा कार्यक्रमामुळे समाजात दिव्यांगासाठी चे शिक्षण प्रशिक्षण व पुनर्वसन संबंधी जनजागृती होईल, असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना कर्मशाळेचे अधीक्षक राजापटेल अ. मलिक यांनी केली तर आभार प्रदर्शन दरभस्तवर चंद्रकांत यांनी मांडले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!