विहिंप मातृशक्ती दुर्गा वाहिनीकडून पोलीस बांधवांना राखी

0
विहिंप मातृशक्ती दुर्गा वाहिनीकडून पोलीस बांधवांना राखी

​ अहमदपूर, ( गोविंद काळे) – सणासुदीच्या काळातही आपल्या कुटुंबाची पर्वा न करता अहोरात्र समाजाच्या संरक्षणासाठी तत्पर असलेल्या पोलीस बांधवांना विश्व हिंदू परिषद मातृशक्ती दुर्गा वाहिनी आणि बजरंग दल, अहमदपूर यांच्या वतीने रक्षाबंधननिमित्त राखी बांधण्यात आली. यावेळी पोलीस बांधवांनी बहिणींना संरक्षणाचे वचन दिले.

​समाजातील प्रत्येक स्त्रीचे वाईट प्रवृत्तींपासून रक्षण व्हावे, समाजात प्रत्येक नारीच्या मागे भाऊ ढाल बनून उभा राहावा, या भावनेतून हा रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक बि.डी भुसनूर, पीएसआय आनंद श्रीमंगल, तानाजी आरदवाड, विशाल मुंडे, शिंदे मारोती, हनुमंत आरदवाड यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

​या प्रसंगी मातृशक्ती दुर्गा वाहिनीच्या माता-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यामध्ये देवगिरी प्रांत सत्संग प्रमुख सीताताई कुदळे, दुर्गा वाहिनी लातूर जिल्हा सहसंयोजिका राधाताई धडे, राजूर प्रखंड संयोजिका विद्याताई कनकदंडे, कलावती भातंबरे, प्रेमा वतनी, विमल जोशी, शारदा घोडके, अनिता लांडगे, योगेश्वरी भोसकर, निशा हलदार, सोनी संगमे, महानंदा लोहारे, मीरा मेड, मीरा घोडके, उषा पाटील, सुनीता बेदरे आदींचा समावेश होता. याशिवाय, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्तेही उपस्थित होते. या अनोख्या रक्षाबंधन सोहळ्यामुळे पोलीस आणि समाज यांच्यातील नाते अधिक दृढ झाले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!