अखंड भारत संकल्प दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालयात ध्वजारोहण
अहमदपूर ( गोविंद काळे ) अखंड भारत संकल्प दिनानिमित्त अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात भारतीय सैन्यातील माजी वैद्यकीय अधिकारी मेजर (डॉ.) मधुसूदन चेरेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, डॉ. शिवाजी सूरजमल, डॉ. अमृत चिवडे, डॉ. प्रवीण जगताप, डॉ. जयप्रकाश केंद्रे, डॉ. नाथराव कराड, माजी सैनिक रमेश मुंडे, शिवाजी इप्पर, श्रीमंत ढवळे, उद्धव इप्पर, तसेच अधिपरिचारिका सौ. मार्था भुसूम, सौ. प्रवीणा पाटील, सौ. जयश्री पडिले यांच्यासह अजय देशमुख, अनिकेत काशीकर, गणेश सूर्यवंशी, प्रवीण कसादे, शिवदास नागरगोजे, शिंदे, दिलीप केंद्रे, गणेश स्वामी, दिलीप कांबळे, शिवाजी पुरी, धोंडीराम जायभाय, राम गोटमुकले आदी मान्यवर उपस्थित होते.
