अहमदपूर शहरात शिवसेनेच्या( शिंदे गट ) पाच शाखांचे उद्घाटन
पोलीस फ्लॅश न्यूज अहमदपूर ( गोविंद काळे): हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून धर्मविर आनंद दिघे यांच्या विचाराने आणि शिवसेना मुख्यनेते उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, ‘गाव तिथे शाखा, घर तेथे शिवसैनिक’ या विचाराला पुढे घेऊन जात, अहमदपूर शहरात शिवसेनेच्या पाच शाखांचे उद्घाटन करण्यात आले.
शिवसेना जिल्हाप्रमुख ब्रह्माजी केंद्रे यांच्या हस्ते या शाखांचे उद्घाटन झाले. याप्रसंगी बोलताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या ’80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण’ या विचारावर भर दिला आणि हेच शिवसेनेचे ब्रीदवाक्य असल्याचे सांगितले. अहमदपूरचे शहरप्रमुख लक्ष्मण अलगुले यांनी शहराच्या विविध भागांमध्ये- थोडगा रोड, रुकमेनगर, तिप्पना नगर, सिद्धार्थ नगर आणि अयोध्या नगर येथे या पाच शाखांचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाला शिवसेना सचिव संजय मोरे, संघटक माजी आमदार राजन साळवी, उपनेते आनंदराव जाधव, संपर्कप्रमुख अॅड. श्रीनिवास क्षीरसागर आणि सहसंपर्कप्रमुख रवि गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला जिल्हा संघटिका उर्मिलाताई भगत, मागासवर्गीय विभाग जिल्हाध्यक्ष जनार्धन भालेराव, ओबीसी/व्हीजेएनटी जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मण गुट्टे, मागासवर्गीय महिला जिल्हाध्यक्ष प्रीती कोळी, तालुकाप्रमुख गोपीनाथ जायभाये, उपजिल्हा प्रमुख किरण स्वामी, गणेश पांचाळ, उपतालुकाप्रमुख प्रवीण केंद्रे, युवासेना तालुका प्रमुख संगम पाटील आणि युवासेना शहर प्रमुख सुरज पाटील आदीसह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
