सहकार मंत्र्यांनी साजरा केला तरुण फोटोग्राफरचा वाढदिवस; महेश स्वामी भावूक
पोलीस फ्लॅश न्युज अहमदपूर( गोविंद काळे ): महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी त्यांचा तरुण आणि होतकरू फोटोग्राफर महेश स्वामी याचा वाढदिवस मुंबईत साजरा करून एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे. कोणतीही कौटुंबिक किंवा राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या महेशसाठी हा क्षण खूपच अविस्मरणीय होता. यानिमित्त महेशने आपले मनोगत व्यक्त करताना सहकार मंत्र्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
आपल्या भावना व्यक्त करताना महेश स्वामी म्हणाले, “आज माझा जीवन खऱ्या अर्थाने सफल झाला. साहेबांनी माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातील मुलाला आपल्यासोबत काम करण्याची संधी दिली. कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की ते स्वतः माझा वाढदिवस साजरा करतील.”
महेशने सांगितले की, साहेबांच्या कृपेमुळे आणि प्रेरणेमुळे त्याला ही संधी मिळाली. राज्याच्या सहकार मंत्र्यांसारख्या मोठ्या नेत्याने एका सामान्य कार्यकर्त्याला दिलेले हे प्रेम आणि सन्मान पाहून त्याला खूप आनंद झाला.
”साहेबांचे राहणीमान, कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची त्यांची पद्धत आणि त्यांचा साधेपणा पाहून मी भारावून गेलो. त्यांच्या या कृतीने डोळे अक्षरशः पाण्याने भरून आले होते आणि मी आनंदाने रडत होतो,” असे महेशने सांगितले.
या घटनेमुळे, राजकारण आणि समाजकारण करत असतानाही, एका सामान्य कार्यकर्त्याला किती महत्त्व दिले जाऊ शकते, याचा एक वेगळा संदेश समाजात गेला आहे. महेश स्वामी यांनी तुकोबांच्या वचनांचा उल्लेख करत आपले समाधान व्यक्त केले, “आणिक काही इच्छा आम्हा नाही फार.”
महेशने साहेबांच्या या प्रेमाबद्दल आणि दिलेल्या संधीबद्दल कायम ऋणात राहण्याची भावना व्यक्त केली. एका मोठ्या नेत्याने एका सामान्य व्यक्तीच्या आयुष्यात आणलेला हा आनंदाचा क्षण खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे.
