विद्यार्थिनींसाठी स्वयंशिस्त आणि स्वसंरक्षण महत्त्वाचे – पीएसआय स्मिता जाधव

0
विद्यार्थिनींसाठी स्वयंशिस्त आणि स्वसंरक्षण महत्त्वाचे – पीएसआय स्मिता जाधव

​अहमदपूर ( गोविंद काळे ) आजच्या स्पर्धात्मक युगात मुलींनी शिक्षणाबरोबरच स्वयंशिस्त आणि स्वसंरक्षणाचे धडे घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अहमदपूर पोलीस स्टेशनच्या पीएसआय स्मिता जाधव यांनी केले. येथील यशवंत विद्यालयात आयोजित विद्यार्थिनींच्या समस्या आणि अडचणींवर आधारित एका जागृतीपर कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
​या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य गजानन शिंदे होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक माधव वाघमारे, पर्यवेक्षक राम तत्तापुरे, शिवाजी सूर्यवंशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
​आपल्या मार्गदर्शनात पीएसआय स्मिता जाधव यांनी विद्यार्थिनींना कोणताही संकोच न बाळगता शिक्षण घेण्याचे आवाहन केले. त्यांनी मुलींना आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच छेडछाडीसारख्या घटनांची माहिती तात्काळ पोलीस स्टेशनला देण्याचे सांगितले. तसेच, शासनाने मुलींच्या संरक्षणासाठी ‘पोक्सो’सारखे कायदे लागू केले असून, अहमदपूर शहरात रोड रोमिओंना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस कठोर पावले उचलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुलींनी केवळ अभ्यासाच्या जोरावर मोठे व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
​कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम तत्तापुरे यांनी केले. सूत्रसंचालन के.डी. बिरादार यांनी, तर आभार महादेव खळुरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशवंत विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!