बालाघाट शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

0
बालाघाट शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

​अहमदपूर (गोविंद काळे) तालुक्यातील रुद्धा येथील बालाघाट शैक्षणिक संकुल – ज्यामध्ये बालाघाट तंत्रनिकेतन, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बालाघाट विधी महाविद्यालय आणि सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल यांचा समावेश आहे – येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
​ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम संस्थेचे संचालक कुलदीप हाके यांच्या हस्ते पार पडला. यावेळी संचालिका शिवालिकाताई हाके यांची प्रमुख उपस्थिती होती.
​आपल्या भाषणात संचालक कुलदीप हाके यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य आणि भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी प्रतिनिधींची निवड. यावेळी तौफिक बक्षी आणि सानवी गाडे या दोघांना विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून पदभार देण्यात आला.
​यावेळी तंत्रनिकेतनचे प्राचार्य कोपनर संग्राम, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मदन आरदवाड, शाळेचे मुख्याध्यापक हरिदास सर यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी मिळून हा सोहळा यशस्वी केला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!