यशवंत प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा, विविध स्पर्धांचे आयोजन
अहमदपूर ( गोविंद काळे ) शहरातील यशवंत प्राथमिक शाळेत १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक विलास चापोलीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य, भाषणे सादर केली. शाळेत चित्रकला आणि रांगोळी स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. तसेच, देशभक्तीपर गीतांवर कवायत सादर करण्यात आली.
यावेळी नगरपालिकेचे अभियंता योगेश कुचेकर उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणही करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माधव भोजराज पाटील, एस. एस. बिराजदार, आनंद बिराजदार, शेख एम. एम., संदीप पांचाळ, वाय. जे. कोलपूसे, जे. डी. मुसळे, अश्विनी गौंड, शिवशक्ती हिपाळे, व्ही. व्ही. बिरादार, ए. बी. राजे, किरण आष्टे, सोपान बडगिरे, पी. पी. मोरे, महानंदा काळवणे, आर. पी. जोगदंड, भाग्यश्री पाटील, रेखा फड, बाळासाहेब करंजकर, बबन गोरगिळे आदी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
