लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

अहमदपूर (गोविंद काळे ) : सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी बोलताना जातीव्यवस्था, गरीबी आणि भेदाभेदामुळे अण्णाभाऊंना शिक्षण घेता आले नाही. सवर्णांकडून होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी दीड दिवसातच शाळा सोडली. अवघ्या दीड दिवसाची शाळा शिकलेल्या अण्णाभाऊंनी पुढे साहित्यक्षेत्रात प्रचंड मोठी कामगिरी केली. आपल्या लेखणी आणि प्रतिभेच्या बळावर बुद्धिमत्ता कुणाची मक्तेदारी नसल्याचं त्यांनी दाखवून दिलं. असे मत संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी व्यक्त केले.
यावेळी संचालिका प्रा.शिवालीका हाके, संचालक कुलदीप हाके, सौम्या मॅडम, भरत दुधाटे, संग्राम सुरनर आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!