वाढदिवसाचा खर्च टाळून सामाजिक भान राखत पूरग्रस्तांना मदत

वाढदिवसाचा खर्च टाळून सामाजिक भान राखत पूरग्रस्तांना मदत

अहमदपूर (गोविंद काळे) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती शिवानंद हेंगणे व युवक नेते शेखर चौधरी यांनी आपल्या वाढदिवसाला होणारा खर्च टाळून सामाजिक भान राखत कोकणात अतिवृष्टीमुळे बेघर झालेल्या गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत अहमदपूर तहसील कार्यालयाच्या मार्फत पुरग्रस्तांना पाठवण्यासाठी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.
नुकत्याच कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक लोकांना उघड्यावर राहावे लागत आहे डोक्यावरील छञ वाहून गेल्याने अनेक लोक बेघर झाले आहेत. लोकांना खाण्याचे प्रश्न निर्माण झाले असून त्यांना आपला संसार सावरण्यासाठी मदतीची अपेक्षा आहे म्हणून ही मदत करण्यात आली.
या केलेल्या मदतीमध्ये गहु, तांदुळ, साखर, दाळ, तेल, चहा पावडर, साबन आदी साहीत्य होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजहर बागवान, पंचायत समिती चे माजी सभापती शिवाजीराव खांङेकर, वसंत शेटकार, सोमशेखर चौधरी, चंद्रशेखर भालेराव, अशिष तोगरे, प्रकाश ससाणे, सय्यद ईलियास, फेरोज शेख,सचिन पङीले, अविनाश देशमुख, अशोक सोनकांबळे, प्रा.रत्नाकर नळेगावकर शिवराज हामणे, रवि गादगे, आकाश भालेराव, कपील किने, ज्ञानोबा चंदेवाङ आदींची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!