महात्मा फुले महाविद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठेंना अभिवादन

महात्मा फुले महाविद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठेंना अभिवादन

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयाेजीत भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची स्मृती शताब्दी व जागतिक दर्जाचे थोर साहित्यिक, विचारवंत साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हिंदी विभाग प्रमुख डॉ. नागराज मुळे यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी डॉ. अनिल मुंडे व डॉ. संतोष पाटील यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्र संचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बी. के. मोरे यांनी केले तर आभार एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी डॉ. पी.डी. चिलगर यांनी मानले. यावेळी कोवीड- १९ च्या नियमांचे पालन करून शिवाजी चोपडे, चंद्रकांत शिंपी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

About The Author